Pimpri : पिंपरी-चिंचवड भागातील आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या नऊ!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 झाली आहे. पिंपरी- चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची 14 मार्चला चाचणी करण्यात आली, त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला, असे सूत्रांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवडमधील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता नऊ झाली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.