Hinjawadi : फ्लॅटमधील इंटेरिअरचे अर्धवट काम करून फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम करण्यासाठी पैसे घेऊन काम अर्धवट करून दिल्याबाबत एका दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जानेवारी ते 14 मार्च 2020 या कालावधीत पुनावळे येथे घडली.

रंजन कुमार विरबहादूर सिंग (वय 36, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनंत सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनंत सिंग याचे सुसरोड येथे अल्फा इंटेरिअर्स हे दुकान आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या पुनावळे येथील फ्लॅटचे इंटेरिअरचे काम करण्यासाठी आरोपीला काम दिले. त्यासाठी फिर्यादी यांनी चार लाख 84 हजार रुपये दिले. पैसे घेऊन आरोपीने फ्लॅटचे अर्धवट काम करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.