Pimpri : पिंपरी चिंचवड शहराची “स्पोर्टस सिटी” कडे वाटचाल -उपायुक्त विठ्ठल जोशी

एमपीसी न्यूज-  पिंपरी चिंचवड शहरातील अनेक (Pimpri) खेळाडूंनी राष्ट्रीय  आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविले आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेले शहर आता “स्पोटर्स सिटी”कडे वाटचाल करीत असून महापालिकेने उभारलेल्या क्रीडा सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका सामान्य प्रशासन ‍विभागाचे उपआयुक्त  विठ्ठल  जोशी यांनी केले. खेळात अपयश हे हसत हसत स्विकारता येते. त्यामुळे जीवन हे हसत खेळत जगा. अपयश आले तर निराश होवू नका. विद्यार्थी जीवनापासून आरोग्य सांभाळा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पिंपरी चिंचवड इज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट विभाग व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आंतर महाविद्यालयीन “युवोत्सव 2023” या विविध क्रीडा स्पर्धेचे दि. 27 ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना  जोशी बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र हॅण्डिकॅप टीमचे कोच व दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू मुजावर, एसबीपीआयएम च्या संचालिका  किर्ती धारवाडकर, यांच्यासह क्रीडा विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तत्पूर्वी, मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच, फुटबॉल, बॉक्स क्रिकेट, टेबल टेनिस स्पर्धेचा मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधून 75 संघांनी सहभाग घेतला.

 

IPL 2023 : चेन्नईला हरवून राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर; चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये घट

उपआयुक्त्  विठ्ठल जोशी पुढे म्हणाले की, शहराला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. हॉकी व क्रिकेटचे राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदाने शहर व परिसरात आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीचे मैदान भोसरी येथे असून त्याच ठिकाणी कबड्डीचे धडे दिले जाणार आहेत. “रोप वे” राष्ट्रीय संघात शहरातील 14 खेळाडूंचा सहभाग नोंदविला आहे. बॅटमिंटन, आर्चरी, शूटींग, हॉलीबॉल तसेच मैदानी खेळांनी खेळांच्या सुविधा देखील मनपामार्फत देण्यात येत आहे.

राजू मुजावर म्हणाले की, भारत देशाच्या अपंग क्रिकेट टीमने सलग बांग्लादेश, थायलंड या देशात वर्ल्डकप जिंकून जागतिक पातळीवर नाव कोरले. जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविता आले. त्यामुळे आपल्यात काही उणिवा असतील तर त्या विसरून जीवनाच्या स्पर्धेत उतरून मैदान गाजवा. महाविद्यालय आणि शहराचे नाव उंचवा, असे म्हणत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

संचालिका किर्ती धरवाडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देत गेल्या सहा वर्षांपासून क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे संयोजन  काजल माहेश्वरी, अमरीश पद्मा आणि नंदलाल पारेख, विशाल निकम, अभिजीत नायडू यांच्यासह विद्यार्थ्यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, ट्रस्टी हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक गिरीष देसाई (Pimpri) यांनी  “युवोत्सव 2023”  साठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.