Pimpri : विविध मागण्यासाठी शहरातील खासगी इंग्लिश शाळा आज बंद

एमपीसी न्यूज – प्रलंबित विविध मागण्यासाठी इंडिपेंडेन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (आयईएसए) वतीने आज (सोमवारी)खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील साडेचार हजार शाळा सहभागी असल्याचे, स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सांगितले.

सिंग म्हणाले, “आयईएसएने असोसिएशन पार्टनर नॅशनल इंडिपेंडेन्ट स्कूल अलायन्सच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी हा बंद ठेवला आहे. आमच्या मागण्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शाळांच्या असून अनेक दिवसांपासून त्या प्रलंबित आहेत. असोसिएशनने नोव्हेंबर मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण व कठोर प्रक्रिया मागे घ्यावी. तसेच 2012 ते 2019 पर्यंत आरटीई 25 टक्के प्रवेशाची थकीत फी परतावा तातडीने द्यावा. राज्यातील सर्व शाळांसाठी ‘शाळा संरक्षण कायदा’ करावा”

स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी. शालेय विद्यार्थी वाहतूकसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्‍त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपवण्यात यावी. पाल्यांच्या शुल्काची पूर्तता न करणा-या पालकांवर शाळेने कोणती कारवाई केली पाहिजे त्याची नियमावली लागू करावी. अशा विविध मागण्यांसाठी आज एक दिवस स्कूल बंद आंदोलन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.