Pimpri: खासगी रुग्णालय चालकांनो 80 टक्के खाटा राखीव ठेवा, बील आकारणी नियमाप्रमाणे करा- महापौरांच्या सूचना

Private hospital operators reserve 80 per cent beds, do billing as per rules - Mayor's instructions

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांनी राज्य सरकारच्या  नियमाप्रमाणे 80 टक्के खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात. रुग्णांसाठी ज्यादा दर आकारणी न करता शासकीय दरानुसार आकारणी करण्यात यावी. रुग्णालयाच्या दर्क्षनी भागात दरपत्रक लावावे. रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी खासगी रुग्णालय चालकांना दिल्या आहेत.

कोरोना या संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत खासगी रुग्णालय प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन आज (गुरुवारी)पालिकेत  करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना व अन्य आजारांबाबत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून आकराण्यात येणा-या दराबाबत काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. शासनाच्या नियमाप्रमाणे बेडस् हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवावेत.

दर आकारणीसुध्दा नियमाप्रमाणे करावी. शहरातील कोरोना बाधितांची संख्या आपल्याला तुमच्या सारख्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने कमी करुन आपले शहर कोरोना मुक्त करावयाचे आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना बाबतीत आठ खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तेथे कोव्हिड रुग्ण दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. इतर रुग्णालयांनाही प्रशिक्षण देण्याचे काम सूरु आहे.

सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना लॉगीन आयडी दिलेले आहेत. त्यामध्ये कोविड नॉन कोविड माहिती भरुन सादर करावयाची आहे. शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे.

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसदस्य सागर अंगोळकर, नगरसदस्या उषा मुंढे, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. राजशेखर अय्यर, डॉ. एस. पी. सिंग, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. एच.एच. चव्हाण, डॉ. प्रशांत खाडे, साईनाथ हॉस्पिटलचे डॉ. सुहास कांबळे, मेट्रो हॉस्पिटलचे डॉ. दिपक कोळगे, गांधी नर्सिंग होमचे डॉ. नितीन गांधी, ब्रम्हचैतन्य सुपरस्पेशियालिटी हॉस्पिटलचे डॉ. महेश शिरसाळकर, सूर्या हॉस्पिटलचे डॉ. दिनकर पासलकर, मॅक्स न्यूरो हॉस्पिटलचे डॉ. उमेश फाळके, माकन हॉस्पिटलचे डॉ. किरण माकन, निरामय हॉस्पिटलचे डॉ. मिलींद जावळे, लुंकड हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी काटे, अश्विनी हॉस्पिटलच्या डॉ. स्मिता घोबले, स्टरलिंग हॉस्पिटलचे डॉ. विनायक शिंदे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. सुमित काळे, डॉ. श्रीकृष्ण जोशी, देवधर हॉस्‍पिटलचे डॉ. एस.एस. देवधर, लाईफपॉईंट हॉस्पिटलच्या डॉ. रक्षिता इंदूरकर, डॉ. युवराज जोगदंड, डॉ. ज्योतीराज मेठी, डॉ. योगेंद्र पांडे, डॉ. सुधिर भालेराव, डॉ. सुहास माटे, डॉ. सतिश कांबळे, डॉ. सारीका झाडे, डॉ. बसवेश्वर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.