Pimpri: पवना धरणात पावसाचा जोर कायम; 47 टक्के पाणीसाठा; शहरवासीयांवरील अधिकची पाणी कपात टळली

एमपीसी न्यूज – मावळातील पवना धरण पाणलोट क्षेत्रात  सोमवारीपासून पाऊस पडायला सुरुवात झाली  असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 37 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 4.55 टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 46.73 टक्के झाला आहे. त्यामुळे तूर्तास पिंपरी-चिंचवडकरावरील अधिकचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. 

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची भिस्त पवना धरणावर आहे.  पावसाळ्यातील जुन, जुलै दोन महिने संपल्याने शहरवासीयांवरील  पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून पाऊस पडत आहे. पाच दिवसांपासून  धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे.

गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 37 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.  4.55 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 जूनपासून 755 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे.  पाणीसाठ्यात 11.44 टक्के वाढ झाली आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे एकदिवसाआड पाणी पुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांवरील अधिक पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 94.17 टक्के होता. तर,  2748 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.