Pimpri: ‘पुणे, पिंपरी पालिका हद्दीतील रेशन दुकाने सकाळी व सायंकाळी चार तास सुरू ठेवावीत’

Pimpri: Ration shops in Pune, Pimpri Municipal Corporation should be open for four hours in the morning and evening demand by gajanan babar सध्या सुरू असलेल्या फक्त चार तास वितरणामुळे धान्य वितरणास अडचणी येत आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना सकाळी व सायंकाळी चार तास धान्य वितरण करण्यास मुभा द्यावी. अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

गजानन बाबर जिल्हाधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा, आत्मनिर्भर भारत योजना तसेच केशरी कार्डधारकांना रेशनिंग दुकानदारामार्फत धान्यपुरवठा केला जातो.

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना धान्य पुरवठा करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणताही नागरिक धान्यापासून वंचित राहणार नाही व कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही.

सध्या सुरू असलेल्या फक्त चार तास वितरणामुळे धान्य वितरणास अडचणी येत आहेत. त्यामुळे रेशनिंग दुकानदारांना सकाळी व सायंकाळी चार तास धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून केंद्र शासन व राज्य सरकारकडून येणारे धान्य योग्य वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचेल व कोणत्याही रास्त भाव दुकानदाराची तक्रार होणार नाही. अशी बाबर यांनी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.