Pimpri: आता साफसफाईच्या कामासाठीही सल्लागार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम, स्मशानभूमी, रस्त्यांच्या कामापासून ते स्मार्ट सिटी सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमले जात आहेत. आता शहरात यांत्रिक पध्दतीने रोडस्विपर मशीनद्वारे क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते साफसफाई करण्याच्या कामासाठाही सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील मोठ्या रस्त्याची साफसफाई रोड स्विपर मशीनद्वारे करण्याची निविदा काढण्यात आली होती. या निविदेचा मुदतवाढ कालावधी 31 आॅगस्ट 2018 रोजी संपुष्टात आला. तर नवीन निविदा तयार करण्यासाठी पर्यावरण आभियांत्रिकी विभागामार्फत महापालिकेने राज्य, केंद्र अथवा मनपाच्या योजनेर्तंगत विविध नाविन्यपुर्ण प्रकल्प आणि पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यासाठी अनुभवी प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करण्याकरिता तीन तज्ज्ञ सल्लागारांचे पॅनल तयार करण्यात आले.

महापालिका आरोग्य मुख्य कार्यालयातून क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात मोठे रस्ते यांत्रिक पध्दतीने ( रोड स्विपर मशीन) साफसफाई कामाची निविदा प्रस्तावित करण्यात येणार आहे. निविदा प्रस्तावित करण्यासाठी शहरातील रस्ते व रुट चार्ट निश्चित करणे, त्यांचा सर्व्हे करणे, आरएफपी तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे यासह इत्यादी कामे करण्यासाठी पर्यावरण विभागाच्या सल्लागार पॅनेलवरील मे. टंडन अर्बन सोल्यूशन कंपनी या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. या निविदेच्या येणा-या अंदाजे एकूण प्रकल्प खर्चापैकी भांडवली खर्चाचे 0.70 टक्के अथवा प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी (दि.11) आयत्यावेळी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.