Pimpri: शिवसेनेकडून पिंपरी महापालिकेला सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर भेट

एमपीसी न्यूज –  शिवसेना नेते, राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी – चिंचवड महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड आणि २०० लिटर सॅनिटायझर भेट दिले.

कोरोना महामारीपासून बचावासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रभावी कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य – वैद्यकीय कामकाजावर देखरेख सुरु आहे, आढावा घेतला जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २७ महापालिकांना वैद्यकीय मदत म्हणून शिवसेनेच्यावतीने सोडियम हायपोक्लोराईड, सॅनिटायझर देण्याचे नियोजन केले आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेला आज (गुरुवारी) ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड आणि २०० लिटर सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटीका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे यांनी हे साहित्य महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपुर्द केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.