Pimpri: सात लाख नागरिकांचे सर्वेक्षण, परदेशवारी केलेले 1800 ‘होम क्वारंटाईन’ 

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील 42 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपर्यंत सहा लाख 76 हजार 617 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. तर, परदेशातून शहरात आलेले 1795 होम क्वारंटाईन आहेत. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी उपचारा दरम्यान संपर्कात आलेल्या पिंपरीतील एका वैद्यकिय महाविद्यालयातील  42 व्यक्तींचे घशातील द्रावांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. तर, शहरात आजपर्यंत 21 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 12 बरे होऊन घरी गेले आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 529 व्यक्तींचे कोरोना तपासणीकरीता घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 445 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज (सोमवारी) 19 संशयितांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

शहरामध्ये आजपर्यंत एकुण 21  रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यापैकी 12  रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित 9 पैकी 8 रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल असून 1 रुग्ण हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे दाखल आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असणा-या 8 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

पिंपरीतील एका वैद्यकिय महाविद्यालयात उपचारा दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्कात आलेल्या 42 व्यक्तींचे घशातील द्रावांचे नमुने तपासणीकामी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना वैद्यकिय महाविद्यालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.