गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Pimpri : नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन; भारतीय मराठा महासंघाचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri) महापालिका हद्दीतील पिंपळेनिलख, विशालनगर, वाकड येथील नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी. कुळवाडी येथील नाल्यावर चालू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरीत थांबवावे. अन्यथा येत्या 15 दिवसांत प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय मराठा महासंघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागांकडून अनधिकृत बांधकाम करण्याचे काम चालू आहे. नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारणाऱ्या महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे चिखली, कुदळवाडी येथे नाल्यावरच तीन एलएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटी रूपये खर्च होणार आहे. चिखली, कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण (Pimpri) होत आहे.

MLA Anna Bansode : भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना करा; आमदार अण्णा बनसोडे यांची प्रशासनाला सूचना

तसेच या भागात लघुउद्योग, भंगार गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्याचे पाणी, सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वारंवार महापालिकेला चिखली परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून मार्करस या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामासाठी महापालिका आठ कोटी रूपयांचा खर्च करणार आहे. महापालिका प्रशासन स्वतःच नाल्यावर असे प्रकल्प उभारत असेल तर यापेक्षा दुसरे दुर्देव नाही. पालिका स्वतः अनधिकृत बांधकाम करू शकतात. पण सामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केल्यास त्यावर बुलडोझर फिरवितात.

Latest news
Related news