Pimpri: स्मशानभूमी नुतनीकरणाच्या नावाखालील उधळपट्टीला ‘स्थायी’चा चाप; प्रस्ताव मागे घेण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 येथील त्रीलोक स्मशानभूमीच्या नुतनीकरणाच्या नावाखाली होणा-या चार कोटी 15 लाख रुपयांच्या उधळपट्टीला स्थायी समितीने चाप चावला आहे. स्थापत्य विभागामार्फेत नुतनीकरण आणि शवागार शीतगृह (कोल स्टोरज) करण्यासाठी तब्बल चार कोटी खर्च केले जाणार होते. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी हा प्रस्ताव पाठीमागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच पैसे आहेत म्हणून काहीही ठराव मंजुरीसाठी आणू नका अशी तंबीही प्रशासनाला दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या 42 स्मशानभूमी, दफनभूमी आहेत. यापैकी एकाही स्मशानभुमीमध्ये शवागार शीतगृह (कोल स्टोरज) ची व्यवस्था करण्यात आली नाही. मात्र, स्थापत्य विभागाने क्रमांक 21 येथील त्रीलोक स्माशानभुमीमध्ये शवागार शीतगृह (कोल स्टोरज) करण्याचा प्रस्ताव आणला होता. त्याला स्थायी समितीने ब्रेक लावला आहे.

त्रिलोक स्मशानभूमीचे नुतनीकरणाच्या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. चार कोटी 15 लाख 23 हजार निविदा रक्कम होती. अंबिका कन्स्ट्रक्शन कंपनीकडून तीन कोटी 74 लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार होते. नुतनीकरणाबरोबच शवागार शीतगृह केले जाणार होते. परंतु, स्मशानभूमीत शवागार शीतगृह (कोल स्टोरज)ची कोणततीही आवश्यकता नसताना त्यावर पैशांची उधळपट्टी होणार होती. त्याला स्थायी समितीने ब्रेक लावला आहे.

राज्यातील अनेक महापालिकांकडे कर्मचा-यांच्या पगारासाठी पैसे नाहीत. आपल्याकडे पैसे आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणतेही ठराव मंजुरीसाठी आणू नयेत, असा आदेश स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी दिला. तसेच हा ठराव पाठीमागे घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.