Pimpri: स्थायी समितीच्या विशेष सभेत 66 कोटींच्या विकासकामांना मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.9 नेहरूनगर येथील जुनी शाळा इमारत पाडून नवीन शाळा इमारत बांधणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे 7 कोटी 93 लाख रूपयांच्या खर्चासह विविध विकासकामांसाठी येणा-या एकूण सुमारे 66 कोटी 20 लाख रूपये खर्चास आज स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे ५४ लाख ५६ हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे-नाशिक रस्त्याच्या पश्चिम बाजूस स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ५० हजार रूपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मध्ये धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळेववस्ती व परिसरामध्ये पावसाळी गटरची सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे २७ लाख ४९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १५ से.क्र. २७, २७ अ २८ व आकुर्डी गावठाणमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणा-या सुमारे २५ लाख ७६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विविध विभागाकडील संगणक यंत्रणा देखभाल व दुरूस्तीकामी येणा-या सुमारे ७८ लाख ६५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मनपाची शाळा, कार्यालये, रूग्णालये इत्यादी इमारतीवर उर्जा बचत कामी सौरउर्जेवर वीजनिर्मिती करणेकामी येणा-या सुमारे २६ लाख ५९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.११ मधील महाबली चौक ते जुन्या आर.टी.ओ ऑफीसपर्यंत क्रॉकीटचा रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ५५ लाख ८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.८ मधील रस्त्याचे दिवाबत्ती व्यवस्थेचे नुतनीकरण करणेकामी येणा-या सुमारे ५३ लाख ९० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. भक्ती-शक्ती उद्यान येथील राष्ट्रध्वज फडकविणे चालन व देखभाल तसेच अनुषंगिक यत्रणेचे चालन देखभाल दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ४६ लाख ८५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तालेरा, भोसरी, आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय येथे प्रत्येकी ३० लिटरचा एक आणि वायसीएम रूग्णालयासाठी ६० लिटरचा एक याप्रमाणे एकूण ४ मायक्रोवेव्ह खरेदीकरणेकामी येणा-या सुमारे १ कोटी १ लाख ४५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ मधील वाघू साने चौक ते नेवाळेवस्ती कॉर्नर ते गणेशनगर कॉर्नर पेव्हींग ब्लॉक बसविणे व दरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ५८ लाख ६८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१ रामदासनगर व इतर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी येणा-या सुमारे ५७ लाख ८६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र.१ चिखली येथील मोरेवस्ती व सोनवणेवस्ती मुख्य रस्त्यास जोडणारे रस्ते जी एस बी व एम पी एम पध्दतीने करणेकामी येणा-या सुमारे ६९ लाख ९५ हजार पयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ मधील मोरेवस्ती अंतर्गत भागात ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी व दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ५८ लाख ९७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१ चिखली येथील सोनवणेवस्ती परिसर औद्योगिक परिसर शेलारवस्ती व औद्योगिक परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेकामी व दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ३९ लाख ९४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. दापोडी येथे पिंपळेगुरव पुल लगत विसर्जन घाट बांधणेकामी येणा-या सुमारे ५७ लाख ८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१ मधील पाटीलनगर मधील गणेश कॉलनी व इतर परिसरात पावसाळी पाण्याचा निचरा होणेसाठी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख ६३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

प्रभाग क्र.१ मधील सोनवणेवस्ती परिसर शेलारवस्ती व इतर परिसरात पावसाळी पाण्याचा निचरा होणेसाठी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख ६६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र.१ मधील मोरेवस्ती व म्हेत्रेवस्ती परिसरात पावसाळी पाण्याचा निचरा होणेसाठी स्टॉर्म वॉटर लाईन टाकणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख १५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ मधील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ५३ लाख ८७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१६ मधील मामुर्डी येथील रस्ते डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ४४ लाख ३७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७ इंदीरानगर व चिंचवडेनगर भागातील रस्ते आवश्यकतेनुसार कॉक्रीटीकरण/ डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ९९ लाख ५२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१७ दळवीनगर व शिवनगरी भागातील रस्ते आवश्यकतेनुसार कॉक्रीटीकरण/ डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१७ वाल्हेकरवाडी भागातील साखळी रस्ता व इतर रस्ते आवश्यकतेनुसार कॉक्रीटीकरण/ डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ९९ लाख ४४ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ७ लांडेवाडी, खंडोबामाळ, गव्हाणेवस्ती येथील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे २५ लाख ३८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

भोसरी ते वाकड बीआरटीएस रस्त्याची स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४६ लाख ८५ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर मधील यंशवंतराव चव्हाण रूग्णालयातील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४४ लाख ६३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ९ मासुळकर कॉलनी परिसरामध्ये मुख्यालय स्तरावर डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करणेकामी येणा-या सुमारे २२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र.१५ से.क्र. २७ व २७ अ मधील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. ३ आणि ४ योजनेअंतर्गत व्ही.टी. पंपाची वार्षीक पद्धतीने देखभाल करणे व आनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे ३१ लाख ७३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ जाधववाडी कुदळवाडी मधील अस्तित्वातील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे २२ लाख ३२ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्र.५ सॅन्डविक कॉलनी परिसरात खडीकरण व डांबरीकरणाने रस्ते विकसित करणेकामी येणा-या सुमारे ४३ लाख ९९ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.५ परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ५४ लाख १८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.५ सॅन्डविक कॉलनी व गवळीनगर परिसरातील खडीकरण व डांबरीकरणाने रस्ते विकसित करणेकामी येणा-या सुमारे ६६ लाख ८ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ब प्रभागातील जलनिसा:रण नलिकांचे वार्षिक पद्धतीने साफ सफाई करणे व चोकअप काढणेचे काम करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी २६ लाख २३ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरातील दफनभूमी १ लिंगायत, १ ख्रिश्चन व ८ मुस्लीम असे एकून १० दफनभूमीत काळजीवाहक पुरविणे, दैनदिन साफसफाई करणे दफनभूमीच्या आतील परिसरातील देखभाल व दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ९९ लाख १० हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीबाहेर उदा.शेवाळवाडी, निरगुडी, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करणेकामी येणा-या सुमारे ४१ लाख ८७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क प्रभागातील जलनिसा:रण नलिकांची ठेकेदारी वार्षिक पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणेकामी येणा-या सुमारे १ कोटी २६ लाख ६१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१९ मध्ये स्टॉर्म वॉटर लाईनची कामे करणेकामी येणा-या सुमारे २८ लाख ९६ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तालेरा रुग्णालयातील नवीन इमारती मधील कॉरीडॉर, सर्व कार्यालयाअंतर्गत भाग स्वच्छता गृहे व बाह्य परिसराचे दैनदिन साफसफाईची कामे करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ८७ लाख ९१ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.