Pimpri News : कोयता, तलवार बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे कोयता, तलवार अशी घातक शस्त्रे जवळ बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 27) रात्री विद्यानगर चौक, चिंचवड येथे केली.

प्रशांत उर्फ मोन्या अनिल सोनवणे (वय 25), सचिन धोंडू तेली (वय 23, दोघे रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुनील चौधरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर चौक, चिंचवड येथे दोघेजण शस्त्र घेऊन थांबले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रशांत आणि सचिन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोयता आणि एक तलवार अशी शस्त्रे जप्त केली. आरोपी स्वतःजवळ शस्त्रे बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करत होते. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.