Pimpri: चाकण, निगडीमधून दोन दुचाकी तर भोसरीमधून रिक्षा चोरीला

Pimpri: Two two-wheelers were stolen from Chakan, Nigdi and a rickshaw from Bhosari फिर्यादी पटेल यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14 सीयु 1053) रात्री साडेबारा वाजता कासारवाडी येथे जोया ऑटोगॅरेज समोर पार्क केली होती.

0

एमपीसी न्यूज – चाकण आणि निगडी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी परिसरातून एक रिक्षा चोरीला गेली आहे. या तिन्ही प्रकरणी शनिवारी (दि.1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात विनोद विलास काळोखे (वय 27, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 बीवाय 8725) 27 जुलै रोजी रात्री दहा वाजता राहत्या घरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 28 जुलै रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या सुभाष चंदर शर्मा (वय 39, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांनी त्यांची 21 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 एफवाय 1752) ट्रान्सपोर्ट नगर येथील त्यांच्या कार्यालयासमोर 9 जुलै रोजी रात्री पार्क केली होती.

रात्री त्यांच्या कार्यालायासमोरून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 10 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात मुजीप अब्दुल पटेल (वय 35, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14 सीयु 1053) 29 जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता कासारवाडी येथे जोया ऑटोगॅरेज समोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा लॉक तोडून चोरून नेली. सकाळी सात वाजता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like