Pimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’चा साठा संपला! शहरात गुरुवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (गुरूवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

या केंद्रांवर मिळणार लस!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा चऱ्होली, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग आणि निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.

कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.