Pimpri : पाण्याची ग्रॅव्हिटी लाईन फुटल्याने पिंपळेगुरव, दापोडी, सांगवीचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी पाईपलाईन फुटल्याने पाण्याची गळती सुरु झाली आहे. दुरुस्ती करण्यासाठी या पाइपलाइनचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या काही भागाचा आज (शनिवार) दुपार व संध्याकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पिंपळेसौदागर पुलाजवळील चिंचवड ग्रॅव्हिटी पाईपलाईन आज (शनिवारी) फुटली आहे. त्यामुळे पाण्याची गळती सुरु झाली आहे. दुरुस्ती करण्यासाठी या पाइपलाइनचे पाणी बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडीच्या पूर्ण भागाचा व नव्या सांगवीच्या काही भागाचा आज दुपार व संध्याकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.