Pune : पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – घर नावावर करून देण्याची मागणी करणा-या पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी आंबेगाव बुद्रुक मधील दळवीनगर येथे दुपारी 3 च्या दरम्यान घडली.

किसन वाघमारे (वय 35, रा. आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणा-या एका 66 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा किसन याची पत्नी किसनसोबत नेहमी वाद घालून त्यांचे राहते घर नावावर करून देण्याची मागणी करत असत. या कारणावरून किसन आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हापुन्हा वाद होऊन किसनला मानसिक त्रास होत होता. याच मानसिक त्रासाला कंटाळून अखेर किसनने त्याच्या घरातील सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी किसनच्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा अंदाज तपासादरम्यान व्यक्त केला जात असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.