Pimpri: पाण्याची ग्रॅव्हिटी लाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपरी, भाटनगर येथे विद्युत वाहिनी टाकताना सांगवी ग्रॅव्हिटी लाईन फुटून पाण्याची गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी या लाईनचा पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

बुधवारी (दि.28) सायंकाळी, रिव्हर रोड, भाटनगर येथे विद्युत वाहिनी टाकताना पाण्याची सांगवी ग्रॅव्हिटी लाईन फुटली. त्यामुळे पाण्याची गळती सुरु झाली. त्यामुळे दुरुस्तीसाठी या लाईनचा पाणीपुरवठा बंद केला आहे. अजूनही, दुरुस्तीचे काम सुरु आहे.

यामुळे या लाईनवर अवलंबून असणाऱ्या पिंपळे सौदागर गावठाण, सोसायट्यांचा भाग, काटे वस्ती इ. भाग तसेच नवी सांगवी व जुनी सांगवीचा भाग या भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच, कासारवाडी – गेटाखालच्या भागाचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.