Pimpri: कोयत्याचा धाक दाखवून कामगाराला लुटले

Pimpri: Workers robbed for fear of being stabbed आरोपी आनंद कांबळेने विनोद डावरे यांना अडवले. कोयत्याचा धाक दाखवून डावरेंना लाथाबुक्क्याने मारहाण केली.

एमपीसी न्यूज- पगाराचे पैसे घेऊन येणाऱ्या कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) रात्री दहा वाजण्याच्या सुमरास राजीव गांधी वसाहत पिंपरी येथे घडली.

आनंद बळीराम कांबळे (वय 35, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरू नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विनोद जालिंदर डावरे (वय 43, रा. राजीव गांधी वसाहत, नेहरू नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डावरे हे केलेल्या कामाचे त्यांच्या मालकाकडून शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पगाराचे पैसे घेऊन येत होते.

त्यावेळी आरोपी आनंद कांबळेने विनोद डावरे यांना अडवले. कोयत्याचा धाक दाखवून डावरेंना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच धमकी देऊन डावरे यांच्याकडू पाच हजार 500 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.