Vadgaon Maval News : जांभूळ फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाय योजना करा – मनसे 

एमपीसी न्यूज – जांभूळ फाट्यावर होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता व वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी जांभूळ मनसे शाखेचे वतीने अध्यक्ष नवनाथ जांभुळकर यांनी बुधवार  (दि 7) MSRDC च्या सहाय्यक अभियंतांना जांभूळ फाटा येथे झेब्रा क्रॉसिंग व सर्व्हिस रोड, सिग्नल, अपघात रोधक फलक व उपाय योजना त्वरित करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.  या उपाय योजना त्वरित न केल्यास जांभूळ मनसे व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशाराहि यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी जांभूळ शाखेचे अध्यक्ष नवनाथ जांभूळकरसह, स्वप्निल राऊत, बाळासाहेब गराडे, सोमनाथ जांभूळकर, जय शिंदे, कैलास गराडे आदी मनसेसैनिक उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जांभूळसह अनेक वर्षांपासून पुणे – मुंबई महामार्गा लगत असणाऱ्या गावांना वाहनांच्या वाढत्या वर्दळीचा व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुर्लक्षित असणाऱ्या अपघातरोधक  अपुऱ्या सुविधांचा नेहमी फटका बसत आला असून यातून बहुतांश निरपराध नागरिकांचा छोट्या – मोठ्या  रोड अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र बळी जाण्याचे हे सत्र MSRDC च्या गलथान व दुर्लक्षित  कारभारामुळे तसेच चालू राहिले  आहे.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी जांभूळ गावातील दुचाकीस्वार तरूणांचा रस्ता ओलांडत असताना टेम्पोच्या जोरदार धडकेने अपघात झाला होता यात रामदास जांभूळकर या तरुणांचा जागीच मृत्यू झाला व दुसऱ्या तरुणांवर गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटूंबियांवर व जांभूळ गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

याबाबत त्वरीत उपाययोजना करून कार्यवाही व्हावी, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.