_MPC_DIR_MPU_III

Hinjewadi News : क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने केले विमानाचे तिकीट बुक

बँकेच्या ग्राहकाला 29 लाख 74 हजारांचा गंडा

0

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीच्या क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने क्रेडीट कार्डद्वारे 29 लाख 74 हजार 833 रुपये एवढी रक्कम विमानाच्या विकीत बुकिंगसाठी वापरली. याबाबत बँकेकडून पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

मिलिकअर्जुन परमेश्वर नंदर्गी (वय 40, रा. हिंजवडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 7) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन माध्यमातून घडला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदर्गी आयसीआयसीआय बँकेत डेप्युटी मॅनेजर आहेत. त्यांच्या बँकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडीट कार्डची माहिती अज्ञात व्यक्तीने हॅक केली. त्या माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने विमानाचे तिकीट खरेदी केले. त्यासाठी त्याने 29 लाख 74 हजार 833 एवढी रक्कम वापरली.

यामुळे बँकेचे ग्राहक आणि बँक अशी दोघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क), 66 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment