PM Narendra Modi Maan ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी – मन की बात ऐका

PM Narendra Modi Maan ki Baat Live

PM Narendra Modi Maan ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी – मन की बात ऐका 

  • भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या जवानांचा अभिमान आहे, हुतात्म्यांसमोर संपूर्ण देश कृतज्ञ
  • लडाखमध्ये आपले जे वीर जवान हुतात्मा झाले, त्यांच्या शौर्यापुढे आज संपूर्ण देश नमन करतो आहे, श्रद्धांजली देतो आहे, संपूर्ण देश त्यांच्यासमोर कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे. या वीरांच्या कुटुंबियांप्रमाणेच, प्रत्येक भारतीयाच्या मनात, त्यांना गमावल्याचे दुःख आहे.
  • ज्यांच्या मुलांना हे वीरमरण आलं त्यांचे माता-पिता, आपल्या दुसऱ्या मुलांनाही, घरातल्या इतर मुलांनाही, सैन्यात दाखल करण्याविषयी बोलत आहेत. खरंच, या कुटुंबियांचा त्याग वंदनीय आहे. हाच दृढ संकल्प आपल्याला, आपल्या जीवनाचे ध्येय बनवायचे आहे.
  • स्वातंत्र्यानंतर, आपल्या पूर्व-अनुभवांचा जेवढा उपयोग करुन घ्यायला हवा होता,तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र, संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, भारत पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे.भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकतो आहे.
  • आपण स्थानिक म्हणजे लोकल गोष्टी विकत घ्याल, त्यासाठी #VocalForLocal होत, त्यांचा प्रचार कराल, तर असं समजा, की देश मजबूत बनवण्यात आपणही आपली भूमिका पार पाडत आहात. ही देखील, एकप्रकारे देशसेवाच आहे.
  • सज्जनांची विद्या, ज्ञानासाठी असते, धन इतरांना मदत करण्यासाठी आणि ताकद, लोकांचं रक्षण करण्यासाठी उपयोगात आणली जाते. भारताने आपली ताकद, नेहमी याच भावनेने वापरली आहे, भारताचा संकल्प आहे- भारताचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण आणि #AatmaNirbharBharat
  • माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता आपण #Unlock च्या काळात आहोत. या काळात, आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे- कोरोनाला हरवायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचे आहे. मित्रांनो, लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात बाळगायची आहे.
  • जर तुम्ही #Mask वापरत नसाल, दोन मीटरचे अंतर ठेवत नसाल, तर तुम्ही स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याला,विशेषतः, घरातली मुले आणि ज्येष्ठांना संकटात टाकत आहात, म्हणूनच, सर्व देशबांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही निष्काळजीपणा करु नका.आपलीही काळजी घ्या आणि इतरांचीही!
  • 2020 या वर्षात अनेक आपत्ती आल्या, संकट येतच असतात. परंतु या आपत्तींमुळे संपूर्ण वर्षच खराब आहे, हा विचार करणं चुकीचं
  • कित्येक वर्षे आपले खाणक्षेत्र लॉकडाऊनमध्येच होते. व्यवसायिक लिलावांसाठी परवानगी देण्याच्या एका निर्णयाने परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. काही दिवसांपूर्वीच अवकाश क्षेत्रात, ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या. या सुधारणांमुळे, हे क्षेत्र आता मुक्त झाले आहे.
  • #COVID19 ने आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीत निश्चितच बदल केला आहे. मी लंडनच्या
    @FinancialTimes मध्ये आलेला एक अत्यंत रोचक लेख वाचला. त्यानुसार कोरोनाच्या काळादरम्यान, आले, हळदी आणि इतर मसाल्यांची मागणी केवळ आशियातच नाही, तर अमेरिकेत देखील वाढली आहे.
  • कृषी क्षेत्रातल्या अनेक गोष्टी देखील लॉकडाऊन मध्ये अडकल्या होत्या. या क्षेत्रालाही आता #Unlock केलं आहे. यामुळे, शेतकऱ्यांना, आपला शेतमाल कुठेही, कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे,आणि, त्यांना अधिक कर्ज मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
  • जसा कापूर, आगीत भास्मसात होऊनही आपला सुगंध सोडत नाही.तसेच, चांगली माणसं आपत्तीच्या काळात देखील आपले गुण, आपले स्वभाव सोडवत नाही. आज आपल्या देशातील जी श्रमशक्ती आहे, जे श्रमिक सहकारी आहेत ते देखील याचे जिवंत उदाहरण आहे.
  • माझ्या प्रिय देशबांधवानो, #COVID19 काळात अनेक लोक तणावात जगत आहेत. तर दुसरीकडे, लोकांनी मला हेही लिहून पाठवलं आहे की कसे लॉकडाऊनच्या काळात, आनंदाचे छोटे छोटे प्रसंग-पैलू देखील त्यांनी आयुष्यात पुन्हा अनुभवले आहेत.
  • आज प्रत्येक मुलाला साप-शिडी हा खेळ माहित आहे. पण आपल्याला माहित आहे का, हे सुद्धा एका पारंपारिक खेळाचेच रूप आहे, ज्याला मोक्ष-पाटम किंवा परमपदम असे म्हणले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.