Pune plastic seized: पुणे महापालिकेची गोडाऊनवर कारवाई , पाच टन प्लास्टीक जप्त

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेने नाना पेठ येथील एका गोडाऊनवर कारवाई करत पाच टन प्लास्टीक जप्त केले आहे.ही कारवाई सोमवारी करण्यात आली.(Pune plastic seized) संबंधीत गोडाऊन मध्ये प्लास्टीकचा मोठा साठा असल्याची तक्रार पुणे महापालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

चुनीलाल बन्सीलाल कचेटा (नानापेठ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत गोडाऊन येथे प्लास्टीकचा मोठा साठा असल्याची तक्रार पुणे महापालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार छापा टाकला असता अंदाजे 5.5 टन कमी जाडीचे प्लास्टीक व नॉन व ओव्हन प्लास्टीक जप्त करण्यात आले. यावेळी गोडाऊन मालकाला 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

Nashik leopard : नाशिकच्या चाडेगाव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

ही कारवाई महाराट्र प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशीक अधिकारी प्रताप जगताप, क्षेत्र अधिकारी सुषमा कुंभार, रेखा तोगरे पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ केतकी घाटगे, (Pune plastic seized) प्रमुख आरोग्य निरीक्षक इमामुद्दीन इनामदार,आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहू पकळे, उमेश देवकर व अमोल पवार आदी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.