PMC : पुणे शहरातील बेवारस वाहने महापालिका करणार जप्त

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आता शहरात (PMC) कित्येक महिन्यांपासून बेवारस रित्या पडलेल्या वाहनांची जप्ती करणार आहे. हि वाहने वाहतूकीला अडथळा ठरत असून त्यांच्यामुळे शहराचे विद्रुपकीरकरण देखील होत असल्याने महापालिके हि मोहीम राबवत आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 22 वाहने जप्त केली आहेत.

शहरात वाहनांची संख्या वाढत असून त्यामुळे पार्किंगची समस्याही निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक बंद पडलेली वाहने रस्ता, पादचारी मार्गावर लावतात. त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, कचरा टाकून अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याचे चित्र शहरात आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेने सुमारे दीड वर्षापूर्वी शहरात मोहीम राबवून सुमारे 1 हजार 200 वाहने जप्त केली होती. एका महिन्याच्या आत ही वाहने सोडविण्यात आली नव्हती. त्यामुळे आरटीओची परवानगी घेऊन या वाहनांचा लिलाव करून भंगारात विकण्यात आली. यातून महापालिकेला दीड कोटी रुपये मिळाले होते, असे माधव जगताप यांनी सांगितले.

Pimpri : महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन

जप्त वाहने अशी घ्या सोडवून –

महापालिकेने जप्त केलेली वाहने एका महिन्याच्या आत शुल्क भरून (PMC) सोडवून घेता येतील. यामध्ये प्रवासी बस, ट्रकसाठी 25 हजार रुपये, हलकी वाहने (10 टना पर्यंत) 20 हजार रुपये, कार, जीप साठी 15 हजार, रिक्षा, टेम्पो साठी 10 हजार तर दुचाकीसाठी 5 हजार रुपये शुल्‍क आहे.

त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचा लावलेले त्यांची बंद स्थितीतील वाहने नोटीस लावल्यानंतर सात दिवसाच्या आत तेथून काढून घ्यावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तरी शहरात सार्वजनीक ठिकाणी तुमची गाडी अशी धुळ खात पडली असेल तर लगेच तीला काढून घ्या असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.