Pimpri : महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुळा नदी सुधार प्रकल्पाचे (Pimpri) भूमिपूजन तसेच, मोशी कचरा डेपो येथील कचर्‍यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एजन्सी) आणि बोयोमॉयनिंग या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला करण्याचे नियोजन आहे. त्या संदर्भातील माहिती पीएमओ कार्यालयास पाठविली आहे.

पंतप्रधान मोदी हे येत्या 1 ऑगस्टला विविध कार्यक्रमांसाठी पुणे शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार झालेल्या प्रकल्पांची माहिती पीएमओ कार्यालयास पाठविली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत असे 8.80 किलोमीटर अंतराच्या नदी पात्राच्या एका बाजूचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करीत आहे. त्यासाठी 276 कोटी 54 लाख खर्च आहे. मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्टू टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे.

Ajit Pawar : आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर; लोकांचा अजित पवारांसोबत संवाद

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात 1.07 मेगावॅट वीज तयार केली आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर 208 कोटी 36 लाख रुपये खर्च करून उभारला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली आहे.

डेपोत जमा झालेल्या 700 टन सुक्या कचर्‍यापासून दररोज 14 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार (Pimpri) आहे. ती वीज प्रतियुनिट 5 रुपये दराने पालिका 20 वर्षे विकत घेणार आहे. ही वीज महापालिका निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे.

त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात सुमारे 35 ते 40 टक्के बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आहे.

पंतप्रधान आवास योजनेत बोर्‍हाडेवाडी व चर्‍होली येथील गृहप्रकल्पांतील सदनिका तयार झाल्या आहेत. बोर्‍हाडेवाडीचा प्रकल्प 100 टक्के तयार असून, चर्‍होलीतील 7 इमारती तयार आहेत. तेथील सदनिकांची चावी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.