PMC Property Tax: मिळकतकर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ – महापौर

PMC Property Tax: Extension till June 30 to pay income tax - Mayor

एमपीसी न्यूज – मिळकत कर भरण्यासाठी आज (31 मे) शेवटचा दिवस असून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. यासाठीची स्थायी समितीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या काळात काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्य झाले नाही. या संकटाच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत पुणेकरांनी 300 कोटींच्या आसपास कर भरला आहे. गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता 31 मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी 31 मेपर्यंत 650 कोटींचा कर जमा झाला होता. आता या मुदतवाढीने कर भरणा वाढण्यास मदतच मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल. या निर्णयासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशीही चर्चा झाली आहे’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.