PMPML : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मंगळवारी पीएमपीएमएल बस मार्गात बदल

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी (PMPML) जयंती आहे. त्या निमीत्ताने चौकांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे मंगळवारी (दि.1) पीएमपीएमएलच्या काही बसमार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

हे बदल दुपारनंतर  होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पुढील मार्गात बदल केल जाणार आहेत.

Maval : मावळातील औंढोलीत  तीन फुटाचे अजगराचे पिल्लू

बस मार्ग क्र. 2, 2अ, 3, 4, 10, 11, 11 अ, 11क, 12, 13, 15, 17, 20, 21, 26, 28, 30, 37, 38, 42, 47, 50, 52, 52 अ, 64, 64 म, 66, 68, 69, 70, 71,72, 78, 89, 90, 103, 111, 117, 118, 118 अ, 199, 216, 227, 227 अ, 231, 232, 233, 233अ,233ब, 294, 295, 297, 298, 299, 339, 354 या मार्गांच्या समावेश आहे.

जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी रस्ता बंद झाल्यास सदरची वाहतूक दुपारपाळीमध्ये लक्ष्मी नारायण टॉकीज कडून डाव्या बाजूस वळवून (PMPML) मित्र मंडळ चौक, सारसबाग मार्गे संचलनात ठेवण्यात येणार आहेत.

तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यास या बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटतील व रस्ता सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बसस्थानकातून बसेस सुटतील.

तरी मंगळवारी पीएमपीएमएलच्या वरील बसमार्गांमध्ये होणाऱ्या बदलाची प्रवाशी नागरीकांनी नोंद घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य (PMPML) करावे असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.