Pune : आजपासून ‘पीएमपीएमएल’च्या पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो फिडर सेवेला सुरुवात

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो स्टेशनसाठी आज (गुरुवारी) फिडर बससेवेची सुरुवात करण्यात आली. त्याचा शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  सचिन्द्र प्रताप सिंह, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वातानुकूलित ई-बस ना हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

Pimpri : शहरात पीएमपीएमएलची चक्राकार बस सेवा

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त घोडके, सह शहर अभियंता प्रमोद बोभासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, कार्यकारी अभिबाघ, मेट्रोचे सिस्टम्स अॅन्ड ऑपरेशनचे संचालक  विनोदकुमार अग्रवाल, डि.जी.एम मनोज डेनियल, पुणे परिवहन महामंडळाचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी वाहतूक नियोजन संचालन अधिकारी नारायण करडे,  डेपो मॅनेजर यशवंत हिंगे, सुनिल दिवाण व भास्कर आदी उपस्थित होते.

पीएमपीएमएल कडून सुरु करण्यात येत असलेल्या या मेट्रो फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. तरी या मेट्रो फीडर बससेवांचा लाभ प्रवाशी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन  पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.