PMPML News : पीएमपीएमएल वाहकाचा असाही विक्रम; एका दिवसात आणले तब्बल 20 हजारांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – प्रयत्न, जिद्द व चिकाटीने सगळे (PMPML News) शक्य होते. तसेच तोट्यात असणाऱ्या पीएमपीएमएलला मात्र एका वाहकाने तिकीट विक्रीतून एका दिवसात एकाच मार्गावर तब्बल 20 हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून दिले आहे.

वाहक सुखदेव बाजीराव जाधव यांनी हा रविवारी (दि.22) निगडी ते लोणावळा या मार्गावर हा विक्रम केला असून त्यांच्या या कामगिरीबद्दल पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांनी अभिनंदन केले.

जाधव हे पीएमपीएमएलमध्ये 2009 सालापासून कार्यरत आहेत. त्यांनी रविवारी निगडी ते लोणावळा या मार्गावर (सकाळपाळीच्या) एका शिफ्टमध्ये तिकीट विक्रीतून 19 हजार 868 रूपये इतके उत्पन्न परिवहन महामंडळास मिळवून दिले. तसेच 1 जानेवारी रोजी ही सुखदेव जाधव यांनी एका शिफ्टमध्ये तिकीट (PMPML News) विक्रीतून विक्रमी 19 हजार 171 रुपये उत्पन्न आणले होते. त्यांच्याच विक्रम त्यांनी या रविवारी मोडला आहे.

Talgaon Dabhade : चौकटींच्या पलीकडचे अंतर-बाह्य निर्मळ व्यक्तिमत्व चंद्रकांत शेटे – रामदास काकडे

निगडी ते लोणावळा मार्गावर रविवारी पीएमपीएमएलच्या एकूण 12 बस धावत होत्या. यामध्ये 7 बसेस नियमित शेड्युलच्या व 5 बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या. या 12 बसेसपैकी एका बसवर सुखदेव जाधव वाहक म्हणून काम करीत होते. त्यांनी त्यांच्या शिफ्टमध्ये बसच्या दोन फेऱ्या केल्या. त्यात त्यांनी हे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

पीएमपीएमएलचे वाहक सुखदेव जाधव यांनी केलेला विक्रम हा पीएमपीएमएलच्या इतिहासातील हे सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम आहे. जाधव यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. सर्व वाहकांनी असाच प्रतिसाद दिल्यास पीएमपीएमएलच्या दैनंदिन उत्पन्नात आणखी वाढ होईल, असे मत पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.