गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Dighi : दिघीमध्ये बारी समाज विकास ट्रस्टच्या वतीने संत शिरोमणी रुपलाल महाराजांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन

एमपीसी न्यूज – दिघी येथे बारी समाज विकास ट्रस्ट (Dighi) पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रुपलाल महाराज मंदिरामध्ये श्री संत रुपलाल महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री विठ्ठल रुखमाई मुर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलश स्थापना व वसतीगृह लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गजानन महाराज मंदिराजवळ, मॅग्झीन कॉर्नर चौक, दिघी, भोसरी या ठिकाणी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत होत आहे.

या सोहळ्याचा भाग म्हणून आज (दि.24) मंगळवारी संतांच्या जयघोषात पालखी शोभायात्रा काढण्यात आली. सोहळया निमित्त सिद्धेश्वर शाळा, गंगा निवास ते संत रुपलाल महाराज मंदिर या मार्गावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ट्रस्टचे अध्यक्ष ओंकार काटोले, सुयश फाऊंडेशनचे सचिव सुरेश अस्वार, पोलीस अधिक्षक (सीआडी, पुणे) डॉ. दिनेश बारी, विठ्ठलराव बारी, कामधेनु संस्थेचे अध्यक्ष सुनिल साळुंके, अष्टविनाय डेव्हलपर्सचे संचालक नागेश वसतकार, योगेश बारी, भाजप म.आ.मो. सरचिटणीस कविता मोगाळे पाटील, विदर्भ माळी उत्कर्ष संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण वावगे, ट्रस्टचे सचिव दिनेश रौंदळे, उपाध्यक्ष राजेश काळपांडे, सह-सचिव भरत बारी, कार्याध्यक्ष शेषराव नानग्दे, खजिनदार विठ्ठल कपले, प्रशांत बारी, डॉ. अतुल कोल्हे, अनंता दामधर, समाधान दलाल, विजय कोथळकर, रमेश भोंडे, संजय बारी, आतिश ढगे, अशोक धुळे, सुरेश मिसाळ, संदिप हिस्सल, कविता ढगे, मनिषा धुळे यांच्यासह समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

PMPML News : पीएमपीएमएल वाहकाचा असाही विक्रम; एका दिवसात आणले तब्बल 20 हजारांचे उत्पन्न

सोहळा कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 9 ते 11 दुपारी 3 ते 5, काकडा आरती सकाळी 6 ते 7, हरिपाठ संध्याकाळी साडेपाच ते साडे सहा असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यासाठी कथा प्रवक्ते म्हणून हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे (पंढरपुर), हभप श्रीकृष्ण महाराज हिंगणे (मेहुणकर), राष्ट्रीय प्रबोधनकार संगीता बोडखे (जळगाव जा.). साथ संगत नागेश्वर सांप्रदायिक भजन मंडळ वरवट बकाल, बुलढाणा एकलारा, बावनबीर, जळगाव जा., उमरा, दानापूर, सोगोडा, सुनगांव, अकोट, अंजनगाव, वानखेड, जामोद हे सेवा (Dighi) देत आहेत.

मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयात कार्यक्रमात सकाळी शोभायात्रा, संध्याकाळी पुजास्थापना, कलशस्थापना, धान्यदिवस, शयनवास कार्यक्रम घेण्यात आले. तर, उद्या बुधवारी (दि.25) रोजी मुर्ती अभिषेक, पुष्प दिवस, जल दिवस, वस्त्र दिवस, द्रव्य दिवस तसेच स्नेह संमेलन, स्नेह भोजन आणि हवन विधी होणार आहे.

तसेच, गुरुवारी पुर्णाहुती प्राणप्रतिष्ठा, कलश स्थापना, सकाळी हभप पुरुषोत्तम महाराज नेमाडे, पंढरपुर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती बारी समाज विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ओंकार काटोले यांनी दिली आहे.

Latest news
Related news