Podcast : संस्कृतीचे मूळ असणाऱ्या नद्यांचं संवर्धन गरजेचे आहे का? डॉ. विश्वास येवले यांची खास मुलाखत

एमपीसी न्यूज : पीसीईटी इन्फीनिटी 90.4 एफ एम द्वारे 22 मार्च रोजी (Podcast) जागतिक जलदिनानिमित्ताने स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ डॉ. विश्वास येवले यांच्यासोबत आर जे माधुरी यांनी विशेष संवाद साधला. पर्यावरण, स्वास्थ्य आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या जलदिंडीचे डॉक्टर येवले हे प्रवर्तक आहेत.

आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरु करणारे डॉ. विश्वास येवले गेली कित्येक वर्ष नदीस्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जगण्याचं, संस्कृतीचे मूळ असणाऱ्या नद्यांचं संवर्धन हि काळाची गरज आहे आणि यासाठी आत्ताच प्रयत्न करणं किती गरजेचं आहे, नदी म्हणजे नक्की काय? आपली एक लहान कृतीसुद्धा नदी स्वच्छ राहण्यासाठी कशी मदत करेल या सर्वांची उत्तरं आपल्याला या मुलाखतीतून नक्कीच मिळतील.

डॉक्टर येवले यांचा विशेष संवाद एमपीसी न्यूजच्या माध्यमातून नक्की ऐका –    Podcast

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.