Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आळंदीमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील श्री काल भैरवनाथ मंदिरात दि.6 रोजी आज श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सकाळी 10 ते 12 गावकरी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भाविकांनी प्रसाद वाटप करण्यात आला. भैरवनाथ मंदिरात सायंकाळी 5 ते 7 यावेळत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.

Podcast : संस्कृतीचे मूळ असणाऱ्या नद्यांचं संवर्धन गरजेचे आहे का? डॉ. विश्वास येवले यांची खास मुलाखत

श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व भगवान श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त माऊलीं मंदिरात रात्री 10 ते 12 जन्मोत्सवाचे कीर्तन पंखा मंडपात मानकरी विठ्ठल मोझे यांच्या तर्फे ह भ प डॉ.नारायण महाराज जाधव यांचे संपन्न होणार आहे. तर रात्री 10 ते 12 विणा मंडपात भजन सेवा संपन्न होणार आहे. रात्री 12 ते 12:30 गोपाळपूजा प्रमुख विश्वस्त हस्ते होणार आहे.रात्री 1 ते 4 (मानकरी) श्री मोझे यांच्या तर्फे हरीजागर होणार आहे.

आज 6 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 12 रोजी श्रीकृष्णाचे जन्माचे कीर्तन गोपाळपुरा येथील गोपाळकृष्ण मंदिरात संपन्न होणार आहे. तेथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पर्यँतश्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.