Chakan Crime News : शेतात काम करणा-या पोकलॅन चालकाला दगड, कोयत्याने मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – शेतात काम करणा-या पोकलॅन चालकाला लाठ्या, दगड, कोयत्याने गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अहिरेगाव येथील गट नंबर 418/1 मधील शेतात मंगळवारी (दि.15) ही घटना घडली.

रामचंद्र गेणु आहेरकर, सोपान रामचंद्र आहेरकर (वय 60), नारायण रामचंद्र आहेरकर (वय 54), रामदास भाऊ आहेरकर, सचिन मधु आहेरकर (वय 28) (सर्व रा. आहिरेगांव, खेड) यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सोपान रामचंद्र आहेरकर, नारायण रामचंद्र आहेरकर आणि सचिन मधु आहेरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कुंडलिक एकनाथ ओझरकर (वय 40, रा. रौंधळवाडी, खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंडलिक हे त्यांचे दाजी दत्तात्रय येळवंडे यांच्या मालकीच्या शेतात पोकलॅनच्या मदतीने जमीन सपाटीकरणाचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी एकत्र येऊन पोकलॅन चालकाला दगड, लाठ्या व कोयत्याने मारहाण केली आणि मशिनचे नुकसान केले. आरोपींनी भिती दाखवून फिर्यादी आणि चालक यांना शेतातून पळवून लावले असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.