Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांसह विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवरही होणार कारवाई

0

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर विनाकारण घराबाहेर मिळणाऱ्या नागरिकांवर देखील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे चांगलेच महागात पडू शकते.

सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, तसेच विनाकारण बाहेर घुटमळणार्‍या एकूण 86 जणांवर मंगळवारी (दि. 24) आली आहे.

13 मार्च 2020 पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, आंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

गुरुवारी (दि. 19) 129, शुक्रवारी (दि. 20) 80, शनिवारी (दि. 21) 29, रविवारी (दि. 22) 6, सोमवारी (दि. 23) 15, मंगळवारी (दि. 24) 86 दुकांदार आणि नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी करण्यात आलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी – 03
भोसरी – 01
पिंपरी – 02
चिंचवड – 05
निगडी – 02
देहूरोड – 02
आळंदी – 01
चाकण – 00
दिघी – 02
सांगवी – 21
वाकड – 20
हिंजवडी – 11
तळेगाव दाभाडे – 04
तळेगाव एमआयडीसी – 01
चिखली – 02
शिरगाव चौकी – 00
रावेत चौकी – 04
म्हाळुंगे चौकी – 05
एकूण – 86

HB_POST_END_FTR-A2
You might also like