Vadgaon Maval : आंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम हांडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज : आंबळे ग्रुप ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी पूनम हनुमंत हांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच सुरेखा नखाते यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला.  

रिक्त झालेल्या जागेवर सरपंच मोहन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत पूनम हांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद बनसोडे यांनी उपसरपंचपदी पूनम हनुमंत हांडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मोढवे, रामदास शेटे, सुरेखा नखाते, कमल चतुर यांच्यासह माजी चेअरमन गोविंद आंभोरे,माजी चेअरमन ज्ञानेश्वर भांगरे, पांडुरंग मोढवे, बंजरंग मोढवे,शंकर आंभोरे (पाटील), दत्ता वायकर,गोरख घोलप, बंडु घोजगे, शंकर आंभोरे, भरत आंभोरे,श्रीकांत मोढवे, संदीप हांडे ,समीर कदम,जगन्नाथ हांडे, हनुमंत हांडे, चंद्रकांत घोलप, सूर्यकांत भांगरे, राजू आंभोरे, प्रकाश बधाले, वसंत हांडे व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हांडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.