Vadgaon Maval News : पोल्ट्री पक्षी भराई दर एक रुपया करावा

मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या विशेष सभेत निर्णय

एमपीसी न्यूज – पोल्ट्री मधील पक्षी भराईचा दर प्रत्येक कंपन्यांनी एक रुपया करावा, असा निर्णय मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या विशेष सभेत घेण्यात आला. याचा मावळ तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय करणा-या शेतक-यांना फायदा होणार आहे.

मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेची विशेष सभा संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक एकनाथ गाडे, ॲड चंद्रकांत खांदवे, सचिन आवटे, एकनाथ पोटफोडे, संतोष घारे, प्रविण शिंदे, संभाजी केदारी, सुभाष केदारी, पंढरीनाथ खरमारे, विनायक बधाले, महेश कुडले, देविदास जाधव यांच्यासह पोल्ट्री उद्योजक उपस्थित होते.

या सभेत पोल्ट्रीफार्मरच्या अडचणींवर विशेष चर्चा झाली. तर लवकरच संघटनेचा तालुका पातळीवरील मेळावा घेण्यात यावा असे ठरले. एकनाथ गाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.