Pimpri News : काव्य मैफील करंडक स्पर्धेत मुंबई येथील ‘शब्दगंध’ संघ विजेता

एमपीसी न्यूज : स्वर्गीय विजयराव कापरे स्मृतिप्रीत्यर्थ समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित सहाव्या वार्षिक काव्य मैफील करंडक स्पर्धेत मुंबई येथील शब्दगंध या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला.

पद्मश्री गिरीश प्रभुणे, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष कैलास भैरट यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

मराठी काव्यविश्वातील या अनोख्या स्पर्धेत राज्यातील सुमारे आठ संघ सहभागी झाले होते. विजेत्यांना सांघिक पारितोषिकांसह वैयक्तिक सादरीकरण, वैयक्तिक लेखन, सूत्रसंचालन यासाठीही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे होत असतानाही सामाजिक विषमता, उद्रेक, शोषण अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह साहित्यातून झाला पाहिजे. कवींनी शहामृगासारखे आपल्याच भावविश्वात रमू नये!” सकाळच्या उद्घाटन सत्रात महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी, “कवितेमध्ये भावनाविष्काराला जीवनानुभवाची जोड असावी!” असे मत व्यक्त केले.

समरसता गतिविधीचे विलास लांडगे यांनी, “अनेक महनीय व्यक्तींच्या पदस्पर्शाने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् ही वास्तू सुगंधित झाली आहे!” असे गौरवोद्गार काढले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे, हेमंत हरहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील सहभागी संघांचे स्वागत अनुक्रमे मीना पोकर्णा, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, सविता इंगळे, रमेश वाकनीस, माधुरी ओक यांच्या हस्ते करण्यात आले. अभय पोकर्णा यांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उपाध्यक्ष सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. रघुनाथ पाटील आणि मयूर भावे यांनी परीक्षण केले. काव्य मैफील करंडक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :-

सांघिक :

प्रथम – शब्दगंध, मुंबई स्मृतिचिन्ह, ₹3000/-

द्वितीय – नादमयी, पुणे
स्मृतिचिन्ह, ₹2000/-

तृतीय – शब्दकारी, पुणे
स्मृतिचिन्ह, ₹1000/-

उत्तेजनार्थ : 1
टाटा मोटर्स, पिंपरी
स्मृतिचिन्ह, ₹500/-

उत्तेजनार्थ : 2
शब्दगंध, पिंपरी
स्मृतिचिन्ह, ₹500/-

वैयक्तिक सादरीकरण :

प्रथम – अवधूत पटवर्धन (शब्दगंध)
स्मृतिचिन्ह, ₹1000/-

द्वितीय – ज्योती सरदेसाई
(शब्दसेतू)
स्मृतिचिन्ह, ₹700/-

तृतीय – माधवी पवार
(विश्वभान)
स्मृतिचिन्ह, ₹500/-

वैयक्तिक लेखन :

प्रथम – स्वप्नाली देशपांडे
(शब्दगंध)
स्मृतिचिन्ह, ₹1000/-

द्वितीय – निरुपमा महाजन
(नादमयी)
स्मृतिचिन्ह, ₹700/-

तृतीय – प्रीतम फिसरेकर
(विश्वभान)
स्मृतिचिन्ह, ₹500/-

सूत्रसंचालन :

प्रथम – आरुषी दाते
(शब्दकारी)
स्मृतिचिन्ह, ₹1000/-

द्वितीय – विजय सातपुते
(शब्दसेतू)
स्मृतिचिन्ह, ₹500/-

परीक्षकांच्या शिफारशीनुसार बालकवयित्री अनुष्का चिटणीस आणि मौली बिसेन यांचा विशेष सन्मान करण्यात आला; तसेच सहभागी प्रत्येक संघाला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

पंजाबराव मोंढे, राजेंद्र भागवत, जयश्री श्रीखंडे, नीलेश शेंबेकर, सीताराम सुबंध, सुप्रिया लिमये, रामचंद्र प्रधान, विनोद चटप, शरद काणेकर, राजू जाधव यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर आणि मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.