Pune : पुणे महानगरपालिका महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांनी भरला अर्ज

काँग्रेसतर्फे उपमहापौरपदासाठी चांदबी हाजी नदाफ

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिका महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांनी तर, काँग्रेसतर्फे चांदबी हाजी नदाफ यांनी आज, सोमवारी अर्ज दाखल केला.

काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक हाजी गफूर पठाण, सचिन दोडके, योगेश ससाणे, युवराज बेलदारे, भैय्या जाधव, गणेश ढोरे, नगरसेविका सायली वांजळे, प्रिया गदादे यावेळी उपस्थित होते.

आघाडीमध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण, आज शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित होते. मतदानादरम्यान शिवसेना आमच्याबरोबर असणार असा, विश्वास विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी व्यक्त केला तर, भाजपमधील नाराज गट फुटून आपल्याला महापौरपदासाठी मदत करणार असल्याचे प्रकाश कदम म्हणाले.

Pune : भाजपतर्फे महापौरपदासाठी मुरलीधर मोहोळ तर, उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना संधी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.