Nigdi : राष्ट्रपती पदक विजेते व्यंकटेश पांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज : निगडी प्राधिकरणातील रहिवाशी व्यंकटेश एकनाथ पांडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते रेल्वेचे निवृत्त अधिकारी होते. (Nigdi) अनेक संस्था संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. रेल्वेच्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे ते उपाध्यक्ष होते. रेल्वेतील विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.

ज्ञानप्रबोधिनी निगडी ची शाळा येथे येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले तसेच शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्ञानप्रबोधनीच्या सहाय्यक समितीचे ते सदस्य होते. रेल्वेतील विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. ज्ञान प्रबोधिनीचे निगडी शाळेचे संस्थापक कैलास वासी वामनराव अभ्यंकर यांच्याबरोबर त्यांनी दीर्घकाळ काम केले.

Wakad accident : भरधाव बुलेटची दुचाकीला धडक बुलेट चालकाचा मृत्यू, तिघे जखमी

त्यांच्या निधनाबद्दल ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉक्टर गिरीश राव बापट,केंद्रप्रमुख व प्राचार्य  मनोज देवळेकर, यशवंत लिमये आणि पर्यवेक्षक  सुधीर कुलकर्णी, (Nigdi News) माजी प्राचार्य सुमनताई शिनोय व ज्ञानप्रबोधनीच्या अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच रेल्वे कर्मचारी फेडरेशनचे अध्यक्ष जे.एम लातूरकर यांनीही सहवेदना प्रकट केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.