PMPML : पीएमपीएमएलच्या मुद्द्यावर चक्क विरोधक एकवटले; धंगेकर आणि मुळीक एकत्र

एमपीसी न्यूज : मागील काही महिन्यातील राजकीय (PMPML) परिस्थिती लक्षात घेता सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही मुद्दा संधी सोडताना दिसत नाहीत. मात्र, आज पुण्यातील पीएमपीएमएलच्या चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्याने त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी वर्गाला बसला. पण या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे सर्व पीएमपीएमएल बस सुरू करण्याच्या मागणीसाठी एकत्रित आल्याचे पाहण्यास मिळाले.

दोघांनीही शहरातील विविध भागात संध्याकाळपर्यंत बस सुरू झाल्या पाहिजे. अशी मागणी करत पीएमपीएमएल व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना रविंद्र धंगेकर आणि जगदीश मुळीक यांनी जाब विचारला. तर, काँग्रेस आणि भाजपचे नेते एकाच मुद्द्यावर एकत्रित आल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच, यावेळी जगदीश मुळीक यांनी रविंद्र धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.

Wakad accident : भरधाव बुलेटची दुचाकीला धडक बुलेट चालकाचा मृत्यू, तिघे जखमी

या ठेकेदारांचा संप आज संध्याकाळपर्यंत मिटेल – ओमप्रकाश बकोरिया

पुणेकर नागरिकांना दररोज 1750 बसेसमधून सेवा दिली जाते. पण, सहापैकी (PMPML) चार ठेकेदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका नागरिक सहन करत आहेत. त्यावर संबधित ठेकेदारासोबत चर्चा सुरू असून आज संध्याकाळ पर्यंत प्रश्न मार्गी लागेल, अशी शक्यता पीएमपएमएलचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.