Talegaon Dabhade : स्नेहवर्धक मंडळाचा जलतरण तलावाचा उपक्रम कौतुकास्पद – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – तळेगावचा विस्तार झपाटयाने होत आहे. स्नेहवर्धक मंडळाची (Talegaon Dabhade) स्थापना ही मुळातच सामाजिक उद्दिष्टे ठेवून झाली. मावळातील हा शिक्षण प्रवाह काळाच्या पुढे धावणारा असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आरोग्यपूरक असे शिक्षण स्नेहवर्धक मंडळ देत आलेले आहे. स्नेहवर्धक मंडळाचा जलतरण तलावाचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी काढले. तळेगाव येथील स्नेहवर्धक मंडळ, सोशल ॲन्ड एज्युकेशन ट्रस्टच्या जलतरण तलाव नूतनीकरण उद्घाटन काकडे यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते संजय करंदीकर, आयर्न मॅन आशिष संधू , अल्ट्रा आयर्न मॅन फिनिशर दशरथ जाधव, आयर्न मॅन विशाल शेटे,हाफ आयर्न मॅन करण मलुष्टे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष गनिमिया शिकिलकर, सचिव किशोर राजस,खजिनदार शिवाजी आगळे, माजी अध्यक्ष सुरेश चौधरी,डाॅ ढाकेफाळकर, सुभाष खळदे, सुनील कडोलकर, ऋषिकेश महाजन, शामराव दाभाडे,संजय संदनशीव,अमोल शेटे,राजेंद्र गोडांबे सह पदाधिकारी व अनेक मान्यवर तसेच महिला भगिनींची उपस्थिती विशेष होती.

काकडे पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याला महत्त्व देऊन कोरोना काळात कोमजलेली फुफ्फुसे पुन्हा फुलविण्यासाठी पोहण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तळेगावकर नागरिक यांचा शारीरिक विकास व्हावा (Talegaon Dabhade) हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्नेहवर्धक मंडळाचा जलतरण तलावाचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे, असे सांगत 70 वर्षावरील संस्थेचे ज्येष्ठ तरूण समाजासाठी आयकॉनिक असल्याचे काकडे यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे म्हणाले की, स्नेवर्धक मंडळाचा इतिहास जुना आहे. संस्थेने आजपर्यंतची केलेली वाटचाल ही खडतर होती. आज कोणतेही कर्ज न घेता संस्थेची नवीन इमारत उभी आहे. हे आपल्या सर्वांचेच श्रेय आहे. संस्थेच्या सुरूवातीपासून ते आजपर्यंतच्या प्रगतीचा विस्तृत आढावा शेटे यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला.

Nigdi : राष्ट्रपती पदक विजेते व्यंकटेश पांडे यांचे निधन

आयुष्यात निवृत्ती ही संकल्पनाच नसते. लोकं ज्यावेळी निवृत्त होतात. त्या 60 व्या वर्षीच मी आयर्न मॅन स्पर्धेच्या तयारीला लागलो आणि 66 व्या वर्षी यशस्वी झालो. आयुष्यात उत्तम आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती संपत्ती आपण सर्वांनी कमवावी आणि ती जपावी असे मत अल्ट्रा आयर्न मॅन दशरथ जाधव यांनी यावेळी मांडले.

स्वागत नूतन कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन लीना परगी यांनी केले तर आभार सागर केंजुर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.