Prithviraj Shooting Update : अखेरीस ‘पृथ्वीराज’चा सेट तोडण्याचा निर्णय

Prithviraj Chauhan Shooting: Finally decided to break the set of 'Prithviraj Chauhan'

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे शूटिंग होत नसल्याने मुंबईतील दहीसर येथे बनवण्यात आलेले अक्षयकुमारच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे  सेट्स आता तोडण्यात येणार आहेत.  पावसाळ्यापूर्वी येथे शूटिंग होऊ शकेल अशी कोणतीही आशा नसल्याने हे सेटस तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हे सेट् नुसतेच ठेवण्यात आल्याने त्यांचा मेंटेनन्सचा खर्च खूप महागात पडतोय. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या यशराज फिल्म्सने हे सेटस तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून यशराजने हा सेट कायम राहू दिला, कारण परिस्थिती लवकरच सुधारेल अशी अपेक्षा होती. तथापि, पावसाळ्यासाठी अजून काही आठवडे बाकी आहेत. त्यामुळे आणखी बरेच दिवस या सेट्सची देखरेख करणे आणि त्यासाठी पैसा खर्च करणे शक्य नाहीये. म्हणून निर्माता आता त्यांना तोडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेत आहेत, असे निर्मिती संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या  सेटवर अक्षयने मोठे सिक्वेन्स शूट केले आहेत.

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘पृथ्वीराज’चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार होता. पण शूटिंग थांबल्यामुळे आता पुढील वर्षापर्यंत लांबणीवर पडला आहे. या चित्रपटामध्ये अक्षयकुमार राजपूत महाराजा पृथ्वीराज चौहान आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर त्यांची पत्नी संयोगिताच्या भूमिकेत आहे. मानव विज मोहम्मद घोरीची भूमिका साकारत आहे.

रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अक्षय कुमारने ‘पृथ्वीराज’च्या मोठ्या भागांचे दहिसरच्या सेटवर चित्रीकरण केले आहे. परंतु काही महत्त्वाचे सिक्वेन्स अजून बाकी आहेत. शूटिंग सुरु होताच यशराज हे सिक्वेन्स आता इनडोर शूट करणार आहे. दहिसरमध्ये दोन सेट बनवले गेले होते. एक राजवाड्याचा आणि दुसरा युद्धक्षेत्राचा, जेथे अ‍ॅक्शन सीन्स शूट करायचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.