Vegan India Movement: व्हेगन इंडिया मुव्हमेंटतर्फे निषेध सभेचे आयोजन

'फील देअर पेन'ने प्राण्यांवरील अत्याचारांना फोडली वाचा!

एमपीसी न्यूज : विविध उद्योगांच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार, त्यांचे होणारे शोषण आणि त्यांची होणारी कत्तल या सगळ्याविरोधात व्हेेगन इंडिया मुव्हमेंटने (Vegan India Movement) ‘राष्ट्रीय पातळीवर जाणूया त्यांची वेदना’ अर्थात ‘फील देअर पेन’ ही राष्ट्रीय स्तरावरील मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वेस्ट साईड समोर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या निषेध सभेत संपूर्ण देशातील व्हेगन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्राण्यांपासून मिळणारे खाद्यान्न आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणांवर प्राण्यांवर अत्याचार केले जातात. या प्राण्यांच्या वेदना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध उद्योगांमुळे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यात येऊन या अत्याचाराचा निषेध करण्यात आला.

Protest rally organized by Vegan India Movementयावेळी व्हेेगन इंडिया मुव्हमेंटच्या (Vegan India Movement) स्वयंसेवकांनी या मोहिमेचा एक भाग म्हणून, बंदिस्त पिंजऱ्यात आणि दाटीवाटीने क्रेटमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना नेमके काय वाटत असेल? याचा अनुभव घेण्यासाठी लोकांना पिंजऱ्यात बसण्यास आणि क्रेटवर जास्तीत जास्त वेळ उभे राहण्यास सांगितले. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये प्राण्यांवर होणारे अत्याचार, क्रूरपणे केली जाणारी त्यांची कत्तल आणि त्यांचे शोषण याविषयी जागृती करणारे फलक आणि शाकाहाराचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणांनी हा परिसर गजबजून गेला होता.

Drama Acting Certificate – कलेसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे – सतिश आळेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.