Neelam Gorhe : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आढावा बैठकीचे आयोजन

पूरपरिस्थिती, जलसंधारण आणि कोरोना कालावधीतील उपाय योजनांचा पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक दौरा होणार..

एमपीसी न्यूज : कोरो इंडिया संस्थेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील काही गावात जलसंधारण काम करण्यात आले. त्याचा अहवाल संस्थेने सादर केला होता. याबाबत १९ एप्रिल, २०२२  रोजी संस्थेने विभागीय आयुक्त, पुणे यांच्यासोबत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी संवाद करून बैठक घेतली होती. या अहवालावर अपेक्षित कार्यवाही काय झाली? याबाबत आढावा बैठका डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) घेणार आहेत.
आज सकाळी त्यांनी महाबळेश्वर येथे वनविभागाच्या विश्राम गृह येथे पत्रकार, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी सोबत संवाद साधला.  यामध्ये त्यांनी पूरपरिस्थिती, जलसंधारण आणि कोरोना कालावधीतील उपाय योजनांचा पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्याबाबत सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून पावसाळ्यामध्ये होणारे पाणी विसर्गाबाबत योग्य नियोजन, पारदर्शकता असावी यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन वेळोवेळी माहिती लोकांना द्यावी. धरणांची दारे उघडण्याची यंत्रणा कार्यान्वित असावेत. प्रत्येक धरणांचे स्थिती दर्शक अहवाल तयार होत आहेत. काही पुल कमी उंचीचे आहेत. त्यातले दोन सातारा जिल्ह्यातील आहेत. ते कमकुवत असून त्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. याचाही आढावा नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) घेणार आहेत.
पूर्बधित क्षेत्रात आपत्ती पुनर्वसन यंत्रणा गाव पातळीवर कशी होत आहे? याचा आढावा येत्या पावसाळ्याच्या आत घेणे गरजेचे आहे. भुयारी गटार साफसफाई होणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता १५ ठिकाणी पाणी साठण्याचे ठिकाणे आहेत. तिथे येत्या काळात उपाय योजना करण्यात येणार आहेत.

 

 

आढावा बैठक

 

ग्रामीण भागात नुकसान भरपाई मिळते, पण शहरी भागात वाहनांचे होणारे नुकसान मात्र दुर्लक्षित राहते. विमा कंपन्या लक्ष देत नाहीत, यावर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा देखील त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त गावात स्पीकरवरून घोषणा करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. अशी यंत्रणा सातारा जिल्ह्यातही व्हावी अशी अपेक्षा आहे. यासाठीचे मोबाईल एप आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल. अशा डॉ. गोऱ्हे जिल्हा निहाय आढावा बैठकीत विविध आठ विभागांचा आणि त्यांच्या योजनांच्या अंमल बजावणी कामाचा आढावा (Neelam Gorhe) घेत आहेत.
महाबळेश्वर परिसरात स्थानिक नागरिकांना राज्य शासनाच्या निवास न्याहारी योजनेचा पुन्हा एकदा लोकांना फायदा व्हावा, यासाठी त्या पर्यटन विभागाशी बोलणार आहेत. मृद् व जलसंधारण विषयात, घनकचरा व्यवस्थापन विषयातील काम अगदी गाव पातळीवर सुरू होण्याची आत्यंतिक गरज आहे. शांततामय संवाद निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य या विषयात काम करण्यासाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत. ते याबाबत प्रभावी पद्धतीने काम करत आहेत, असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

 

शाश्वत विकास उद्दिष्टे विषयावरील विशेष माहिती पुस्तिका यावेळी उपस्थीत पत्रकारांना देण्यात आली. काही प्रमुख उद्दिष्टांची माहिती यावेळी उपस्थित पत्रकार आणि शिवसेना पदाधिकारी यांना देण्यात आली. येत्या ९ मे, १० मे आणि ११ मे रोजी अनुक्रमे सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांच्याशी डॉ. गोऱ्हे संवाद साधणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि तालुकप्रमुख राजेश कुंभारघरे, तालुका संघटक संपर्क प्रमुख संदीप भोज, तालुका प्रमुख संतोष जाधव, युवासेना तालुका प्रमुख नितीन भिलारे, शहर प्रमुख महेश गुजर, उप शहर प्रमुख उस्मान खरकांदे, माजी शहर प्रमुख सुनील नाना साळुंके, प्रवीण शिंदे, प्रवीण कदम, शंकर ढेबे, किसन खामकर, राजू साळुंके, सातारा जिल्ह्याच्या माजी संघाटीका लीनाताई शिंदे, तालुका संघाटिका वनिता जाधव, शहरप्रमुख मेधा चोरगे, सुनंदा मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासाने, विकास काळे, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे, अजित यादव हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या स्थानिक प्रश्नावर चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.