NCP Youth : भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : दररोज होणारी महागाई तसेच अच्छे दिनचा भाजपने केलेला वाद आदीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांनी युवक राष्ट्रवादीमध्ये प्र‌वेश केला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिपक गुप्तासह २५ कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.०८ मे) युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये (NCP Youth) प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगसेवक नाना काटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित गव्हाणे म्हणाले,  की ”केंद्र सरकारने सात वर्षांत काय काम केले? तर, देशवासियांची दिशाभूल करण्याचे काम केले. या खोट्या सरकारला नागरिक तर कंटाळलेच आहेत. त्याचबरोबर भाजपाचे पदाधिकारीही कंटाळले आहेत. पिंपरी-चिंचवड (NCP Youth) शहरात बदल नक्कीच होणार आहे. आणि त्या बदलाची ही नांदी आहे.”

Maval Taluka NCP : मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी जाहीर

इम्रान शेख म्हणाले, की ”पावलोपावली केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेल्या सरकारला विकास म्हणजे काय हे माहीत नाही. भाजपाची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आली आणि विकास थांबला. अजित दादांनी केलेल्या कामाची उद्घाटने करण्यातच यांची पाच वर्षे गेली. मात्र, आता बदल होणार आणि परत खऱ्या विकासाला सुरूवात होणार आहे.

यावेळी माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, राष्ट्रवादीच्या (NCP Youth) ज्येष्ठ नेत्या शमीम पठाण, ज्योती गोफणे, युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, कामगार नेते युवराज पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, शुभम कांबळे, सागर गायकवाड, अनिकेत शिरसाट, सतेज परब, मयूर खरात आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.