Pubji News : ‘पबजी’ने सहा दिवसांत केले ‘इतक्या’ खात्यांना निलंबित
एमपीसी न्यूज: पबजी हा गेम जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात हा गेम बॅन झाला असला तरी बाकी देशांमध्ये पबजी मोठ्या प्रमाणात खेळला जातो. टेनसेंट या कंपनीच्या पबजी मोबाईलने आता चिटींग करणारी अकाऊंट्स निलंबित करण्याची मोठी कारवाई केली आहे. पबजी मोबाईलने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
8 जानेवारी ते 14 जानेवारीच्या काळात कंपनीकडून तब्बल 12,17,342 अकाऊंट्स कायमस्वरूपासाठी निलंबित करण्यात आली आहेत. या अकाऊंट्सला यापुढे कोणत्याही माध्यमावर पबजी गेम खेळता येणार नाही.
ऑटो एम हॅक्स किंवा कॅरॅक्टमध्ये मोठे बदल करणे तसेच एक्स रे व्हिजनचा वापर करणे, वेगावर वचक ठेवण्याचे हॅक्स वापरणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. ‘बॅन पॅन’ या नावाची ही कारवाई होती.
पबजी मोबाईलमध्ये वेगवेगळ्या रॅंक्स असतात. या कारवाईत कोणत्या रॅंक्सच्या किती वापरकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली याची माहिती पबजी मोबाईलने दिली आहे.
यांत ब्रांझ- 38 टक्के, सिल्वर- 11 टक्के, गोल्ड- 9 टक्के, प्लॅटीनम- 11 टक्के, डायमंड- 12 टक्के, क्राऊन- 10 टक्के, एस- 6 टक्के आणि कॉनक्विरर- 3 टक्के इतक्या पबजी खात्यांवर कारवाई केली गेली आहे.