Punavale Crime News : पोलिसांच्या वेशात लिफ्ट मागून कार चालकाला पिस्तूल दाखवून धमकावले

एमपीसी न्यूज – पोलिसांसारख्या खाकी वेशात तसेच हातात लाठी घेऊन कार थांबवून लिफ्ट मागितली. त्यानंतर कार चालकाच्या पोटाला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी पावणे नऊ वाजता पुनावळे येथे घडली.

सुरेशचंद्र जोशी (वय 44, रा. काटे वस्ती, पुनावळे. मूळ रा. उत्तरांचल) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोशी त्यांच्या कार (एम एच 14 / सी एस 5472) मधून कामावर जात होते. पुनावळे येथे पुणेविले सोसायटीच्या गेट समोर खाकी कपडे घातलेल्या आणि हातात लाठी असलेल्या एका व्यक्तीने जोशी यांना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने थांबवले.

कारमध्ये बसल्यानंतर मिलेनियम शॉपिंग सेंटरच्या समोर पुनावळे येथे आरोपीने जोशी यांच्या डोक्याला आणि पोटात पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीचे तीन साथीदार जोशी यांच्या कारजवळ आले. त्यातील एकाने जोशी यांना बाहेर ओढून कारमध्ये मागे बसण्यास धमकावले.

याबाबत भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), 135, भारतीय दंड विधान कलम 506 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.