Pune : पुणे विभागात कोरोनाचे 11 हजार 86 रुग्ण; त्यातील 6 हजार 241 ठणठणीत

11 thousand 86 patients of corona in Pune division; Out of which 6 thousand 241 patients are in critical condition

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 86 झाली आहे. तर विभागातील 6 हजार 241 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 4 हजार 334 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कालच्या (बुधवार) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 9, सोलापूर जिल्ह्यात 55, सांगली जिल्ह्यात 2, कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आज (गुरुवारी) दुपारी तीन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विभागामध्ये एकुण 94 हजार 919 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 90 हजार 669 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 350 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 79 हजार 340 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 11 हजार 86 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 8 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 203 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 18 आहे. कोरोनाबाधित एकूण 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील 578 कोरोना बाधीत रुग्ण असून 223 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 24  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 1135 कोरोना बाधीत रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 565 आहे. कोरोना बाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 124 रुग्ण असून 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 50 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 645  कोरोना बाधीत  रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 370 आहे. कोरोना बाधित एकूण 6  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.