Pune : क्रिकेट खेळताना 14 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील हडपसर (Pune) भागात 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वेदांत धामणगावकर असे या तरुणाचे नाव आहे. 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागल्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले

दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांतचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी (Pune) सांगितले.

IPL 2023 – लो स्कोरिंग सामन्यामध्ये चेन्नईचा एकतर्फा विजय; कॉन्वेचे सलग तिसरे अर्धशतक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.